BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: स्मशानभूमी, दफनभूमीचे कामकाज वैद्यकीय विभाग सांभाळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 42 स्मशानभूमी, दफनभूमीच्या कामकाजाची जबाबदारी वैद्यकीय विभागाकडे सोपविण्यात आली आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता, गतीमानता, सूसूत्रिपणा यावा, निर्णयप्रक्रिया सुलभ व जलद होण्याकरिता आरोग्य विभागाकडून स्मशानभूमीची जबाबदारी आता वैद्यकीय विभागाकडे अंदाजपत्रकीय तरतुदीसह वर्ग करण्यात आली आहे. या कामकाजवर नियंत्रणाची जबाबादारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर असणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा फेरबदल केला आहे.

महापालिकेच्या शहरात 42 स्मशानभूमी, दफनभूमी आहेत. लिंगायत समाजासाठी एक, मुस्लिम समाजासाठी तीन आणि ख्रिश्चन समाजासाठी एक अशा पाच दफनभूमी आहेत. या दफनभूमीचे कामकाज त्या-त्या धर्माच्या संस्थाना देण्यात आले आहे. स्मशानभूमी, दफनभूमी वैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत. सुरक्षा काळजीवाहक पुरविणे, मयत पास घेवून त्याची नोंद करणे, वैद्यकीय विभागाकडे जमा करणे. उद्यान संबंधित कामकाज, दैनंदिन साफसफाई, स्वच्छता विषयक कामकाज, विद्युत दाहिनी, डिझेल दाहिनी, गॅस दाहिनी इत्यादी कामकाज सुरक्षा, आरोग्य, उद्यान, विद्युत व पर्यावरण या विभागांमार्फत करण्यात येत होते.

  • स्मशानभूमी, दफनभूमीच्या कामकाजाचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 5 फेब्रुवारी आढावा घेतला. कामकाजामध्ये विभागांमधला परस्पर समन्वय कामकाजाचे नियोजन व एकसूत्री नियंत्रणाचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या कामकाजात पारदर्शकता, गतीमानता, सूसूत्रिपणा यावा, निर्णयप्रक्रिया सुलभ व जलद होण्याकरिता, तसेच या कामकाजाचे अधिक्षण, तपासणी व नियंत्रण इत्यादी संबंधित सर्व कामकाज महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे स्थायी स्वरुपात वर्ग करण्यात आले आहे. या कामकाजवर नियंत्रणाची जबाबादारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर असणार आहे.

ही कामे करावी लागणार!
महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत येणा-या स्मशानभूमीमध्ये सुरक्षा, स्वच्छता, उद्यानाच्या कामकाजा संबंधित क्षेत्रीय कार्यालनिहाय एजन्सींची नेमणूक करावी. पाच दफनभूमीचे कामकाज त्या-त्या धर्माच्या संस्थाना देण्यात आले आहे. त्यानुसार उर्वरित दफनभूमीचे कामकाज देण्यात यावे. स्मशानभूमी, दफनभूमीच्या कामकाजावर क्षेत्रिय कार्यालयातील किटकनाशक विभागाचे आरोग्य निरीक्षक, मलेरिया निरीक्षक यांचे पर्यवेक्षिय नियंत्रण राहिल.

  • स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी, डिझेल दाहिनी, गॅस दाहिनी ज्या विभागामार्फत बसविण्यात आलेल्या आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती, नवीन यंत्रणा बसविण्याचे काम त्याच विभागाकडे राहील. मयत व्यक्तींचा अत्यंविधी, अंत्यसंस्कार विद्युत व गॅस दाहिनीमध्ये मोफत करण्यात येतात. ते पर्यावरणपुरक देखील आहेत. त्यामुळे याचा जास्तीत-जास्त वापर होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेमार्फत करण्याच्या धोरणाचा फेरविचार करणे आवश्यक असल्याने त्यानुसार कार्यवाही करावी. स्मशानभूमी, दफनभूमीच्या कामकाजाबात आरोग्य विभाग, सुरक्षा विभाग व उद्यान विभाग यांच्याकडे असलेल्या अंदाजपत्रकीय तरतूदी वैद्यकीय विभागाकडे वर्ग करण्यात याव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
HB_POST_END_FTR-A2

.