Pimpri: चांगल्या कामासाठी स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे – सरला पाटील

एमपीसी न्यूज – आपल्या कामावर आपली निष्ठा असली पाहिजे. निष्ठावान माणूस स्वत: सोबतच इतरांचीही प्रगती करत असतो आणि चांगले काम करण्यासाठी आपले स्वास्थ्य देखील चांगले असणे गरजेचे असते, असे मत सरला पाटील यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथे महिला दिनाचे औचित्य साधून मिलेनियम कंपनीने क्रांतीवीर चापेकर विद्यामंदिरमध्ये श्रीमती सरला पाटील यांचे स्वअनुभव कथन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मिलेनियम कंपनीचे संचालक हरेश अभिचंदानी, अंजली पाटील, करिश्मा कक्कर, मुख्याध्यापिका वासंती तिकोने आदी उपस्थित होते.

  • तरुण पिढीला उद्देशून संयमाने व अडचणींना तोंड देत कोलमडून न पडता हिंमतीने कसे उभे राहावे याविषयी मार्गदर्शन केले. सरला पाटील पुढे म्हणाल्या, “मानसिक स्वास्थ्याबरोबर, शारीरिक स्वास्थ्यही अतिशय महत्वाचे असते म्हणून त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे गेल्यास ते दूर पळते आणि आपण एक कणखर व्यक्ती बनतो”

स्मिता जोशी यांनी संस्था व संस्थेच्या अंतर्गत चालणारे शिक्षण विभाग यांची माहिती करुन दिली. संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. चापेकर बंधूच्या स्मृती जपणारा चापेकर वाडा व त्याचे होणारे आंतरराष्ट्रीय संग्रहालय याविषयी सखोल माहिती करुन दिली. अंजली पाटील यांनी संस्थेची ओळख करुन दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.