Pimpri : हेवन स्पोर्ट्स क्लबचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज- एस.व्ही.जे.सी.टी. स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित, शिवाजी महाराज जयंती निमित्त, 16 मार्च ते 23 मार्च “डेरवण युथ गेम्स” 2019 चे आयोजन डेरवण, कोकणात करण्यात आले. या स्पर्धेत चिंचवड मधील ‘हेवन स्पोर्ट्स क्लब’च्या एकूण पाच खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

निकाल खालीलप्रमाणे :

एरोबिक्स जिमनॅस्टिक
14 वर्षांखालील वयोगट,
वैयक्तिक महीला
निधी असबे
13.30 सुवर्ण पदक
वृंदा सुतार
13.10 रौप्य पदक

रिदमीक जिमनॅस्टिक
10 वर्षांखालील वयोगट,
अनुष्का लुणावत
रोप 7.2 सुवर्ण पदक
क्लब 6.2 रौप्य पदक

अनन्या देव
रोप 6.0 कास्य पदक
हुप 5.3 कास्य पदक

14 वर्षांखालील वयोगट
मैत्रेयी क्षीरसागर
रोप मध्ये सुवर्णपदक

संस्थेतर्फे क्षितीजा राऊत यांनी पंचाचे कार्य पाहिले तर हर्षद कुलकर्णी यांनी प्रशिक्षण दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.