Pimpri : हेवन स्पोर्टस क्लबमध्ये साजरी झाली रंगपंचमी

एमपीसी न्यूज- मराठी सण आपली परंपरा व धर्म जागरणास सहकार्य करतात.आपले सण साजरा करण्यात हेवन स्पोर्टस क्लब नेहमी हिरीरीने पुढाकार घेत आला आहे.असाच दर वर्षी प्रमाणे यंदाही क्लबमध्ये रंगपंचमी साजरी झाला.

सर्व खेळाडू व पालकांनी रंग खेळायला पुढाकार घेतला. विविध मराठी व हिंदी गाण्यांवर नाचुन धमाल केली. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने झाला‌.संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्था प्रमुख व प्रशिक्षक अलका तापकीर व सूत्रसंचालन चैतन्य कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.