Pimpri: सलग पाचव्या दिवशीही पिंपरी-चिंचवड शहर परिसरात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस पडत आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांवर खड्डे वाढल्याने वाहतूक मंदावली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 1836 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात तळी साचली आहेत. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सेवा वाहिन्यांसाठी खोदाई केलेले रस्ते मुरुमाने बुजविण्यात आले आहेत. पावसाने हा मुरूम वाहून गेला आहे. तर, काही ठिकाणी मुरूम खचून खोल खड्डे तयार झाले आहेत. मोठ्या वाहनांचे चाक त्यात रुतून बसत आहेत. हे रस्ते चिखलाने बरबटले असून त्यावरुन वाहने घसरत आहेत.

  • अंतर्गत भागासह मुख्य रस्त्यांवरुनही संथगतीने वाहतूक सुरु आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होत आहेत. तर,चिखली येथील इंद्रायणी नदी पुलावरून धोकादायक वाहतूक होत आहे.

दरम्यान, साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दवाखाने तसेच रुग्णालयांचे बाह्य रुग्ण विभागात रुग्णांची गर्दी पहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.