Pimpri: पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस

Heavy rains in Pimpri-Chinchwad city area

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरामध्ये आज (मंगळवारी) जोरदार पाऊस पडला.  पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वच भागात साडेचार वाजल्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.

शहरात सोमवारी पाऊस पडला होता. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेचार नंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाने काहीवेळ विश्रांती घेतली होती. त्यांनतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

शहराच्या सर्वच भागात पाऊस पडत आहे. पिंपरी,  चिंचवड,  वाकड,  सांगवी,  पिंपळेगुरव,  पिंपळेसौदागर,  निगडी,  आकुर्डी,  भोसरी, दिघी, च-होली सर्वच भागात पाऊस पडला आहे.

यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, शहरातील काही भागातील घरामध्ये रस्त्यावरील, नाल्यातील पाणी शिरले आहे. भोसरीतील धावडे वस्ती, कोंडीबा लांडगे मार्ग येथील घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.