BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: शहरासह पुण्यातही ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यातही मूसळधार पाऊस सुरु झाला. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. अजानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट झाली. शहरात फक्त दीड तासात 43 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पिंपरी, चिंचवड, भोसरी, चिखली, निगडी, आकुर्डी परिसरातील ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळे हेवत गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली.

पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरवात झाली..मागील दोन दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर या पावसामुळे पुण्यात गारवा निर्माण झाला. चाकण परिसरात देखील जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात तर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

ट्रान्सपोर्ट नगर निगडी प्राधिकरण –

चिंचवड एम्पायर इस्टेटजवळ रोडवर साचलेले पाणी

ट्रान्सपोर्टनगर, निगडी-प्राधिकरण

इंडियन ऑइल पेट्रोल पंप – निगडी प्राधिकरण

दुर्गा टेकडी रोड ट्रान्सपोर्टनगर

भक्ती-शक्ती चौक इंद्रधनुष

एमआयडीसी कंपनी

म्हेत्रे ब्रिज

निगडी मॉडर्न शाळा

 

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like