Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा जड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज – वाकड व हिंजवडी येथील यशस्वी प्रयोगानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर जड वाहनांना व खासगी ट्रॅव्हल्सना, कंपनीच्या बसेसना प्रायोगिक तत्वावर दिवसा पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. यामध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गाचाही समावेश आहे. ही बंदी 27 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे.

# जुना पुणे- मुंबई महामार्गावर देहुरोड येथील सेंट्रल चौक ते दापोडी हॅरीस पूल दरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळात सर्व जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
# वाकी ते चाकण सकाळी साडे सात ते दुपारी एक व नंतर दुपारी चार ते रात्री नऊ पर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे.
# देहूगाव ते आळंदी दरम्यानच्या रस्त्यांवर जड वाहनांना बंदी असणार आहे.
# तळेगाव ते चाकण दरम्यान देखील सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे.
# औंध ब्रीज ते वाकड ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर सकाळी सात ते दुपारी एक व दुपारी चार ते रात्री नऊ याकाळात जड वाहनांना बंदी राहणार असून भोसरी चौक ते दिघी मॅगझीन चौक या मार्गावरही सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे.
# पिंपरी येथील शगुन चौक व बाजारपेठ मार्ग येथे देखील सकाळी आठ ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते आठ पर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे.
# म्हाळसांकात चौक ते लोकमान्य हॉस्पीटल व म्हाळसाकांत चौक ते खंडोबामाळ येथेही सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
# सांगवी, पिंपळे गुरव या रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. नाशीक फाटा कडे येणाऱ्या सर्व मार्गावर सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे.

शहरातील रस्त्यावर दिवसभर सुरु असणाऱ्या खासगी जड वाहतूकीवर नियंत्रण आणून शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न असून त्यानुसार 27 नोव्हेंबर पर्यंत प्रायोगीक तत्वार जड वाहनांना बंदी असणार आहे. याच काळात वरील मार्गावर जड वाहनांना पार्कींग तसेच हॉल्टींगला सुद्धा बंदी असणार आहे. याबाबत नागिराकांना त्यांच्या सूचना लेखी स्वरुपात पिंपरी-चिंचवड आयुक्तालय ऑटोक्‍लस्टर येथे 26 नोव्हेंबर पर्यंत देण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.