Pimpri : ‘निसर्ग’चा फटका बसलेल्या 700 कुटुंबांना ‘उन्नती’कडून मदतीचा हात

Help from 'Unnati' to 700 families affected by 'nisarg'

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झाले. या    पार्श्वभूमीवर   पिंपळे सौदागर येथील उन्नती फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त भागातील सुमारे 700  कुटुंबाना अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

निसर्गाच्या तडाख्यात कोकण किनारपट्टीवरील अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे उन्नति सोशल फाउंडेशनच्या त्यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

फाउंडेशन तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरातील गावांमध्ये सुमारे 700  कुटुंबाना अन्नधान्य वाटप केले. याकामी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवडचा राजा या मंडळाचे सहकार्य लाभले.

उन्नती फाउंडेशनच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी कायम पुढाकार घेतला जातो, असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.