Pimpri: ‘नपुसंक’ असल्याची माहिती लपविली, पतीसह चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पती नपुसंक असल्याची माहिती लपवून फसवणूक केली. तसेच लग्नामध्ये मानपान केला नसल्याचा राग मनात धरुन माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नंनदेवर फसवुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात 25 वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती नपुसंक असल्याची माहिती सासरकडील लोकांनी लपवून ठेवली होती. लग्न झाल्यापासून पतीने वैवाहिक सुखापासून वंचित ठेवले.

पतीने अनोळखी इसमासोबत असलेल्या अनैसर्गिक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ क्‍लीप पाठविली. पती नपसूक असल्याचे माहित असताना सासरच्यांनी लपवून ठेऊन आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्याचबरोबर लग्नात मानपान केला नाही म्हणून शाररीक व मानसिक छळ केला. माहेराहून पाच लाख रुपयांची मागणी केली. नांदविण्यास नकार दिल्याने माहेरी आणून सोडले असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार 5 फेब्रुवारी 2018 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत पिंपरी आणि वडगावशेरी, पुणे येथे घडली. पिंपरी ठाण्याचे फौजदार निकम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.