Pimpri:  उच्चांक! औद्योगिकनगरीत आज 715 नवीन रुग्णांची नोंद, 341 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू

Highs! 715 new patients were registered in the industrial city today, 341 were discharged and 6 died :मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विविध भागातील 686 आणि  शहराबाहेरील 29 अशा 715 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  आजपर्यंतची ही उच्चांकी रुग्णावाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 341  जणांना आज घरी सोडण्यात आले.   दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 9790 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवेंसदिवस मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. दररोज रुग्णवाढीचा नवा उच्चांक होत आहे.  जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 24 हजार होईल असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

दरम्यान, मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुळे  आज 6  जणांचा मृत्यू झाला आहे. भोसरीतील 70 वर्षीय वृद्ध,  थेरगांवातील 72 वर्षीय, चिंचवड येथील 72 वर्षीय,  नेहरुनगर येथील 84 वर्षीय, पिंपरीतील 64 वर्षीय आणि रहाटणीतील 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 9790  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 5900  जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 162 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 49 अशा 211 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3109 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1380

# पॉझिटीव्ह रुग्ण – 715

#निगेटीव्ह रुग्ण – 973

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1396

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3109

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 683

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 9790

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3109

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 211

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 5900

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 26797

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 89058

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.