Pimpri : हिमानी पुराणिक हिचे दुबईत झालेल्या ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड स्पर्धेत यश

एमपीसी न्यूज- दुबई येथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, ऑफिशियल पार्टनर युनिस्को आयोजित ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड 2018 नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत कु. हिमानी पुराणिक हिने मेडीटोरियस अवॅाड जिंकून यश संपादन केले आहे.

दुबई येथील मदिनाथ थिएटर झुमिराह येथे हे ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील व भारताबाहेरील संस्थांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण डॉ. पं. दर्शना जव्हेरी (नृत्य गुरू), डॉ. जी.प्रतिश बाबू, ज्ञानरथ पुरस्कार विजेत्या उज्ज्वला नगरकर आणि नेहा पाटकर यांनी केले.
सुप्रियाज डान्स अकॅडमीच्या संस्थापिका सुप्रिया धाइंजे-संत यांच्याकडे हिमानी ही गेल्या दोन वर्षांपासून नृत्याचे शिक्षण घेत आहे.या स्पर्धेचे आयोजन हेमंत वाघ व रत्ना वाघ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.