BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : माधव रोहम यांना हिंदरत्न कामगार पुरस्कार जाहिर

एमपीसी न्यूज – ग्रीव्हज कॉटन ॲण्ड अलाईट कंपनीज एम्प्लॉइज युनियनचे सरचिटणीस आणि पुना एम्प्लॉईज युनियन आयटकचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते माधव रोहम यांना हिंदरत्न कामगार पुरस्कार जाहिर झाला आहे.

हिंद कामगार संघटनेच्या (इंटक संलग्न) 12व्या वर्धापनदिनानिमित्त खराळवाडी पिंपरी येथील संघटनेच्या कार्यालयात सोमवारी (2 सप्टेंबर) दुपारी 4 वाजता संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कैलास कदम व इतर मान्यवर कामगार नेत्यांच्या उपस्थितीत माधव रोहम यांना मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.