Pimpri : हर्षाली वर्तक, स्वानंदी तुपे यांना हिरकणी पुरस्कार, साई कवडे यांचा मावळा पुरस्काराने गौरव

"हिरकणी पुरस्कार 2018" प्रतापगडावर संपन्न

एमपीसी न्यूज – मावळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या “हिंरकणी पुरस्कार 2018” प्रतापगडावर संपन्न झाला.हा पुरस्कार हर्षाली वर्तक, स्वानंदी तुपे यांना तर साई कवडे यांना मावळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सहयाद्री तसेच हिमालयातील भटकंतीची दखल मावळा प्रतिष्ठाननी घेतली. प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची “हिरकणी” आणि “मावळ” ही उपाधी देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन जाधव ,नितिन भिलारे ,विजय साबळे, रमाकांत बने, पंडित झेंडे, सचिन तुपे, अनिल वाघ, तसेच हवेली रिपाइंचे सरचिटणीस मारुती कांबळे , भाऊ गायकवाड,श्रीनिवास वाघ आदी उपस्थित होते.

जेष्ठ इतिहासकार आप्पा परब यांच्या कडून “हिंरकणी 2018” हा पुरस्कार हर्षाली वर्तक यांना देऊन गौरविण्यात आला. तसेच साई कवडे यांना “मावळा” पुरस्काराने गौरविण्यात आले. साईने आता पर्यंत 89 गड किल्ले भटकंती केली आहे ,तसेच कमी वयात लिंगाणा सारखा सुळका सर केला. तसेच त्यांनी स्टोक कंग्री बेस कॅम्प पर्यंत चढाई केली आहे. पुढील वर्षी तो साथ खंडातील किलीमांजरो हया शिखरावर चढाई करणार आहे
हर्षाली हिने सहयाद्रीच्या गड किल्या पासून सुरवात करून हिमालयातील 5 मोहिमा तसेच जपान मधील माउंट फुजी सारख्या शिखरावर अभिमानाने भारताचा झेंडा फडकवला आहे. भारतातील सर्वाधिक उंचीचे शिखर कांचनजंगा सर करण्याचा तिचा मानस आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.