Pimpri: शहरातील ऐतिहासिक वास्तूंची संवर्धन यादी तयार करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ब-याच ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे आहेत. या वास्तुंच्या संवर्धनासाठी पुरातत्व (हेरीटेज) समितीची स्थापना करून कार्यवाही करण्याची नगरसेवक आणि नागरिकांकडून मागणी होत आहे. हेरीटेज समिती स्थापन करण्यापूर्वी महापालिका हद्दीतील ऐतिहासिक वास्तुंची यादी करण्यात येणार आहे.

शहरात ऐतिहासिक वास्तू व वस्तु संवर्धनाबाबतची यादी तयार करण्याचा प्रस्ताव पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांनी सादर केला आहे. या प्रस्तावानुसार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांना संपूर्ण शहरातील ऐतिहासिक वास्तु आणि वस्तु यांची संवर्धनाची यादी तयार करून अहवाल करण्याच्या कामासाठी पाच लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार या कामकाजासाठी येणा-या अनुषांगिक खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.