Pimpri : शिवकालीन शस्त्रे पाहण्याची शहरवासीयांना संधी

एमपीसी न्यूज- शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी पिंपरी चिंचवडकरांना उपलब्ध झाली आहे. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या वतीने निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आज, शनिवार आणि उद्या रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रदर्शनात विविध प्रकारचे भाले, तलवारी, बाण, ढाली वेगवेगळ्या प्रकारचे टाळे पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे दुसरी महायुद्धामध्ये उत्क्रृष्ट कामगिरी केल्याबद्दल आय डब्लू रॅंकधारक सैनिक सूर्यवंशी यांना भेट दिलेली जर्मन तलवार या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहे. इतिहास प्रेमींसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1