Pimpri: ‘शिडी’ खराब निघाल्याने दुकानदाराला मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानातून खरेदी केलेली ‘शिडी’ खराब असल्याने खरेदीदाराने दुकानदाराला मारहाण केली. ही घटना पिंपरीतील नेहरुनगर येथे शनिवारी (दि.25) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी दुकानदार हितेश चंदु रामदानी (वय 23, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनानी यांचे पिंपरीतील नेहरुनगर येथे किरण मेटल्स या नावाने दुकान आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता अनोळखी व्यक्ती तिथे आले. दुकानातून खरेदी केलेली ‘शिडी’ खराब असल्याने त्याने रामनानी यांना शिवीगाळ केली. हातातील स्टिलच्या कड्याने तोंडावर मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.