Pimpri : हितेश मूलचंदानी खून प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे; पिंपरीतील व्यापा-यांची मुख्यंत्र्याकडे मागणी

व्यापारी बांधवाकडून हितेश मूलचंदानी कुटुंबियाचे सांत्वन

एमपीसी न्यूज – हितेश मूलचंदानी हत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सिंधी साहित्य अकादमीचे कार्यकारी सदस्य गिरीश रोहिडा, महाराष्ट्र प्रदेश सिंधी साहित्य अ‍ॅकॅडमीचे डॉ. गुरुमुख जगवानी यांनी नुकतीच भेट घेतली.

यावेळी हितेश मूलचंदानी हत्येप्रकरणी न्याय मिळावा, आऱोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे पिंपरीतील व्यापा-यांनी सांगितले.

  • यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, डॉ. गुरुमुख जगवानी, भाजप जिल्हासदस्य कमल मलकानी, सरचिटणीस जयदेव डेंबरा, सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष शिवनदास पमनानी, भाजपा व्यापारी पिंपरी कॅम्पचे अध्यक्ष राजू नागपाल, सामाजिक कार्यकर्ते किशोर केसवानी, व्यापारी जितू मंगवानी, इंद्रलाल बजाज, श्रीचंद संगदिल, श्रीचंद नागरानी, सुरेंद्र मंगवानी, राजेश चांदवानी, राजेश दखनेजा, हरीष भोजवानी आदी व्यापा-यांबरोबर व्यापा-यांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like