Pimpri : हप्त्याची मागणी करत कामगाराला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- हप्ता न दिल्याने तिघांनी टायरच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. प्रकरणी रविवारी (दि.३१) पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

छोटूकुमार श्रीबनवारी राम (वय १९, रा. टेल्को रोड, पिंपरी) असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी नवनाथ डेंगळे (वय ४०, रा. यशवंतनगर, पिंपरी) व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पिंपरीतील यशवंतनगर चौक येथे केजीएन टायरच्या दुकानात छोटूकुमार कामाला आहे. नवनाथ डेंगळे एका महिन्यापूर्वी दुकानात आला. तुला येथे धंदा करायचा असेल तर मला महिन्याला काही पैसे द्यावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी (दि.३१) रात्री साडेनऊच्या सुमारास तो इतर दोन साथीदारांसह दुकानात आला. तू मला महिन्याला पैसे का देत नाहीस, अशी विचारणा केली.

त्यावेळी फिर्यादी छोटू कुमार याने पैसे मालकाकडून घ्या, असे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून लोखंडी रॉडनी मारहाण केली. छोटूकुमारच्या ओळखीचे रामशंकर गुप्ता हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.