Pimpri: दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच सदभावना दिनानिमित्त शपथही यावेळी ग्रहण करण्यात आली.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही प्रकारच्या हिसांचाराचा अवलंब न करता, वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व मतभेद विचार विनिमय करुन तसेच संविधानिक मार्गाचा अवलंब करुन, सोडविण्याची प्रतिज्ञा, सदभावना दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली. महापौर राहुल जाधव यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<