Pimpri: महापालिकेतर्फे मधुकर पवळे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका सुमन पवळे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.निगडी चौकात झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य उत्तम केंदळे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काळभोर, नलिनी फुगे, नारायण फुगे, बापू घोलप, रामाप्रसाद, संतोष कवडे, ज्ञानेश्वर चिखले, राजाराम राऊत, तुकाराम राऊत उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.