Pimpri : निस्वार्थ भावनेने होणारा सन्मान म्हणजे खरा सन्मान – डॉ. राजेंद्र वाबळे

एमपीसी न्यूज – राजकीय पक्ष आणि सामाजिक हे आमचे कान आणि डोळे आहेत. कामाच्या व्यापामुळे नकळत आमच्याकडून काही गोष्टी राहून जातात, ते निदर्शनास आणायचे काम कार्यकर्ते करत असतात पण, त्याचबरोबर चांगल्या कामाचे कौतुक फार कमी लोकं करतात. युवा सेनेच्या वतीने करण्यात आलेला सन्मान निस्वार्थ भावनेने करण्यात आलेला सन्मान आहे, असे भावनात्मक उदगार डॉ.राजेंद्र वाबळे यांनी व्यक्त केले.

‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’निमित्त पिंपरी चिंचवड युवासेनेच्या वतीने वायसीएम रूग्णालयामध्ये डॉक्टराचां सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.राजेंद्र वाबळे बोलत होते. यावेळी युवासेनेच्या वतीने रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ.शंकर जाधव, डॉ गायकवाड, डॉ सोनी, डॉ अनिकेत लाठी, डॉ विनायक पाटील, डॉ अंबीके यांचा सन्मान करण्यात आला.

  • या कार्यक्रमाचे नियोजन युवासेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी केले. यावेळी सहायक आयुक्त मनोज लोणकर, पिंपरी युवा सेना अधिकारी अभिजित गोफण, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले,विभागसंघटक निलेश हाके, पिंपरी उपशहर अधिकारी विनय खांमघळ, चिंचवड उपशहर अधिकारी राहुल पलांडे, भोलाराम पाटील, रविराज मांडवे, मनोहर कानडे, सनी कड, गोपाळ मोरे, संदीप वाघ, रामदास वानखेडे व शहरातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.