Pimpri : ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांच्या ‘भविष्यकोश’ या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – कासारवाडीतील ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांच्या ‘भविष्यकोश’ या पुस्तकाचे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपसभापती डॉ. हेमंत तापकीर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भविष्यकोश हे पुस्तक अंत्यत वाचनीय ते संग्रही ठेवण्यासारखे आहे, असे तापकीर म्हणाले.
गुरुवारी झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लेखक उमेश स्वामी, भक्तीप्रकाशनचे संपादक डॉ. विजयकुमार स्वामी, राजदीप तापकीर आदी उपस्थित होते.

‘भविष्यकोश’ या पुस्तकामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2020 या वर्षाचे राशीभविष्य आहे. उपवास, वृत्ते यांची उपयुक्त माहिती आहे. कुबेर उपासनेचे महत्व, अधिकार देणारे ग्रहयोग, सोने-खरेदी मुहुर्त 2020, ग्रहण विचार 2020 असे अभ्यासपूर्ण लिखाण आहे, असे लेखक उमेश स्वामी यांनी सांगितले.
डॉ. विजयकुमार स्वामी यांनी उमेश स्वामी यांनी लिहलेल्या राशी भविष्याबद्दल कौतुक केले. त्यांचे अभिनंदन केले. उमेश स्वामी हे पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्ष ज्योतिष व वास्तुसल्लागार क्षेत्रात एक उत्तम मार्गदर्शक म्हणून ते प्रसिद्ध आहेत, असे राजदीप तापकीर म्हणाले.