Pimpri : चौघांनी मोडले हॉटेल व्यावसायिकाच्या नाकाचे हाड

हॉटेल व्यावसायिकाशी हुज्जत घालून तोडफोड

0

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये रूमची विचारपूस करत चार जणांनी मिळून हॉटेल मालकाशी हुज्जत घालून हॉटेलमध्ये तोडफोड केली. तसेच हॉटेल मालकाच्या नाकाचे हाड मोडून जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि. 12) नेहरूनगर पिंपरी मधील आर आर हॉटेलमध्ये पहाटे पावणेदोनच्या सुमारास घडला.

श्रीधर भोजा शेट्टी (वय 65, रा. नेहरूनगर, पिंपरी. मूळ रा. सुरतकल, ता. मंगलोर, जि. दक्षिण कर्नाटक) असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय धनाजी, सागर नामदेव तांदळे (दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी), धनराज भाऊसाहेब ठाकूर (रा. पिंपरीगाव), एक अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेट्टी यांचे नेहरूनगर येथे न्यू टेल्को रोडवर आर आर हॉटेल आहे. बुधवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास आरोपी त्यांच्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी ‘आम्हाला रूम पाहिजे’ असे सांगितले. त्यावर ‘तुम्ही थोडे थांबा, मी कामगार मुलाला बोलावतो’ असे शेट्टी यांनी सांगितले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्यावर प्रतिकार करत शेट्टी यांनी ‘मी आपल्याला शिवीगाळ केली तर कसे वाटेल’ असे म्हटले. या रागातून आरोपींनी शेट्टी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शेट्टी यांच्या नाकाचे हाड मोडले.

आरोपींनी हॉटेलमध्ये राडा करून संगणक, प्रिंटर, तांब्याची समई, लिकरचे शोकेस, शोकेसमधील दारूच्या बाटल्या, झाडांच्या कुंड्यांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच शेट्टी यांचे चुलत भाऊ पद्मनाभन शेट्टी यांना देखील आरोपींनी शिवीगाळ केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like