Pimpri : टेरेसच्या दरावाज्यावाटे येवून घरातील सव्वा लाखांचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज  – घराच्या टेरेसच्या सेफ्टी डोअर तोडून त्याद्वारे (Pimpri) घरात प्रवेश करत चोराने घरातील दागिन्यावर हात साफ केला आहे. हि घरफोडी 7 ते 8 मे दरम्यान पिंपरीतील उद्यम नगर येथे घडली आहे.

याप्रकरणी मोसीन अफसर शेख (वय 19 रा.उद्यमनगर) यांनी बुधवारी (दि.10) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : कडधे गावातील कब्रस्थानच्या संरक्षक भिंतीच्या कामास सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी नसताना घराच्या टेरेसच्या सेफ्टी दरवाजा तोडून चोराने घरात प्रवेश केला. त्याने घरातील बेडरुम मध्ये जात कपाटाताली फिर्यादीच्या (Pimpri) पत्नीचे 45 ग्रॅम वजनाचे 1 लाख 28 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. फिर्यादी घरी आले असता हा सारा प्रकार उघडकीस आला व त्यांनी थेट पिंपरी पोलीसात धाव घेतली. पिंपरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.