Pimpri : शहरात पाच ठिकाणी घरफोड्या; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पाच ठिकाणी चोरी झाल्याची पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झाली आहे. एमआयडीसी भोसरी, चाकण, निगडी, चिंचवड आणि चिखली पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झाली असून यामध्ये एकूण 3 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात प्रवीण लक्ष्मण पवार (वय 41, रा. मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण 25 मे रोजी कामानिमित्त गावी गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून चांदीची मूर्ती, घड्याळ, ब्रेसलेट, हि-याची अंगठी, चांदीचे कॉईन असा एकूण 23 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. प्रवीण सोमवारी (दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

  • चाकण पोलीस ठाण्यात नवनाथ विठ्ठल खडके (वय 29, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे सहा तोळ्यांचे दागिने चोरून नेले.

निगडीमध्ये फ्लॅटचा दरवाजा तोडून 45 हजारांची चोरी केली. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, एलसीडी टीव्ही, चांदीचा कॉईन असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कौस्तुभ श्रीनिवास साबळे (वय 33, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिसात फिर्याद दिली.

  • घराचा कडीकोयंडा तोडून घरातून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 75 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी युवराज बंडू गव्हाणे (वय 32, रा. वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

रामकृपाल रामसेवक मंडल (वय 50, रा. रुपीनगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवला. रामकृपाल त्यांच्या कामानिमित्त 19 एप्रिल रोजी बिहार येथे त्यांच्या मूळ गावी गेले होते. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून टीव्ही, चांदीचे शिक्के आणि रोख रक्कम असा एकूण 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रामकृपाल गावाहून रविवारी (दि. 26) परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

  • शहरातील पाच पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी एकूण 3 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.