Pimpri : प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा – गजानन चिंचवडे

एमपीसी न्यूज – प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा अशी मागणी पोलीस फेंन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवड यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, मुळशी, खेड तालुक्यांची हद्द नवीन पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली आहे. या आयुक्तालयात जवळपास हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या परिसरातील कायदा, सुव्यवस्था उत्तम रहावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसाठी पिंपरी-चिंचवड शहरात घरकुलसारखी योजना राबविली पाहिजे.

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाकडे अद्यापही अनेक भूखंड शिल्लक आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या वसाहती उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी भूखंड आरक्षित करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.