BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: गृहनिर्माण सोसायट्यांनी 15 दिवसात पाण्याची टाकी निर्माण करावी -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी 15 दिवसात जमिनीवर पाण्याची टाकी करावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, सोसायट्यांना टाक्या निर्माण करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. नागरिकांनी पंपाद्वारे पाणी वरच्या टाकीमध्ये घ्यावे. थेट नळजोडाला लावलेले विद्युत जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. महिला पोलीस, पोलिसांच्या कारवाईत विद्युत पंप जप्त करण्यात येणार आहेत. मोटर जप्त 2 पथके, पंपिंगसाठी 2 पथके तयार केले आहेत.

नागरिकांना पाणी वापरावर मर्यादा आणण्यासाठी महत्त्व पटवून द्यावे लागेल. पाण्याचे सोर्स मर्यादित आहे. पाणी धरणात असले तर पम्पिंगची मर्यादा आहेत. त्यामुळे अतिरिक्त पम्पिंगची क्षमता वाढवावी लागणार आहे. भामा आसखेड योजनेचे काम वेगाने सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3