Pimpri : हम्टी डम्टी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – सरस्वती कला मंदिरचे हम्टी डम्टी प्ले स्कूलचे २० वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, उपक्रमस सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

  • पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात हे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमुंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. अनमोल असे हे जीवन आनंदाने आणि उत्साहाने जगण्याचा संदेश या बालचमुंनी नृत्यांतून दिला. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कलागुण सादर करत प्रेक्षकांनी मने खिळवून ठेवली.

या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन अशोक भिंगे, डॉ. महेश सिंधीकर, विद्यानिकेतनचे बनी रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरस्वती कला विद्यामंदिरचे अध्यक्ष प्रदीप बागी, प्रशांत कुमार, गायत्री बागची, पोर्णिमा बागची, स्वरिया कुमार, तन्वी अगरवाल, निरल गवाले, निलीमा गवाले, उज्वला माने, प्रिती बिर्ले, शिखा माल, लिसा जिना, विराज यादव, राहूल सिंग, अनंत शर्मा, सौरभ कुमार, प्रसेनजित दनाने, सुरज करक्रांती, मल्लिनाथ करक्रांती, गजानन गवाले यांनी संयोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.