Pimpri : बालविवाह प्रकरणी पतीला अटक; 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नवरी मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील (Pimpri ) लग्न केले म्हणून नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे तर 14 जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 मे ते 2 जून 2023 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी नवरा मुलगा राहूल सुरज भोसले (वय 22 रा.पिंपरीगाव) याला अटक केली असून सात महिला आरोपी, रोहन राजेंद्र कांबळे (वय 22), लालसो कांबळे (वय 70), तुषार गायकवाड (वय 22), अल्पवयीन मुलगा, शिवाजी साळवे (वय 45) व अटक आरोपीचे तीन मावस भाऊ यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : खोलीच्या उघड्या शटरद्वारे पाच मोबाईल चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अल्पवयीन आहेत हे माहिती असताना देखील आरोपींनी संगणमत करत मुलीचे लग्न लावून दिले. तर अटक आरोपीने पीडितेवर बळजबरी करत शारीरिक संबंध ठवले. शिवीगाळ (Pimpri) व मराहाण करत शारीरिक व मानसिक त्रास दिला. यावरून पोलिसांनी 15 ते 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.