Pimpri : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला शिवीगाळ करत हिटरच्या वायरने मारहाण केली. यामध्ये पत्नीला गंभीर इजा झाली. याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी नेहरूनगर पिंपरी येथे घडली. याबाबत 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीला राहुल काकडे (वय 29, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती राहुल चोकाब काकडे (वय 34) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने पत्नी शीला यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावर शीला यांनी ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगितले. यावरून राहुल याने पाणी गरम करण्याच्या हिटरच्या वायरने शीला यांना मारहाण केली. यामध्ये शीला जखमी झाल्या. पोलिसांनी पती राहुल याच्यावर गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like