Pimpri : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव परमेश्वर (वय 30, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

कविता महादेव परमेश्वर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संजय सावळेराम लोंढे (वय 51, रा. कृष्णानगर पोलीस वसाहत, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे यांची मुलगी कविता हिला पती महादेव याने खूप त्रास दिल्याने व छळ केल्याने तिने चिंचवड येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी कविता हिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कविता यांच्या पती आरोपी महादेव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.