_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: हुश्श…! महापालिका आयुक्तांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

Hush ...! Municipal Commissioner's report 'negative'

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आज (मंगळवारी) दुपारी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री निगेटिव्ह आले आहेत.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा मोरवाडीत सरकारी ‘अविष्कार’ बंगला आहे. त्यांच्या बंगल्यासमोर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या वडीलांना कोरोनाची बाधा झाली होती.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर सुरक्षारक्षकासह कुटुंबियांचे रिपोर्ट रविवारी पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आयुक्त हर्डीकर सोमवारपासून ‘होम क्वारंटाईन’ होते. तसेच आयुक्त हर्डीकर हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या देखील संपर्कात आले होते.

त्यामुळे त्यांनी आज मंगळवारी दुपारी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट रात्री आले असून ते निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.

याबाबत एमपीसी न्यूजशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”मी होम क्वारंटाईन झालो होतो. घरातून काम करत होतो. आज दुपारी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आता आले असून ते निगेटिव्ह आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.