_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : ‘मी नगरसेवक आहे, मी पत्रकार आहे’; दारू पिऊन हुज्जत घालणाऱ्या 20 जणांवर गुन्हा

'I am a corporator, I am a journalist'; Crime against 20 people for arguing under the influence of alcohol

एमपीसी न्यूज – मद्यधुंद अवस्थेत ‘मी पत्रकार आहे, नगरसेवक आहे, गाववाला आहे’ तुमची नोकरीच घालवतो’, अशा भाषेत पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या मद्यपीसह २० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पत्राशेड झोपडपट्टी, पिंपरी येथे रविवारी (दि.12) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

अमर अशोक कापसे (वय. 42, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर, पिंपरी) याच्यासह 15 ते 20 अज्ञात इसमा विरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे ( वय. 50) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कापसे आणि इतर 15 ते 20 जण पत्राशेड, पिंपरी येथील अय्यपा मंदिरासमोर बेकायदेशीरपणे एकत्र येऊन जेवण आणि दारुची पार्टी करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या पोलीस शिपाई खोडदे यांनी जमावाला जाब विचारला.

त्यावर आरोपी कापसे याच्यासह जमावाने खोडदे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच ‘मी पत्रकार आहे, नगरसेवक आहे, गाववाला आहे’ तुमची नोकरीच घालवतो’ अशी अरेरावीची भाषा करून गोंधळ घातला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.