Pimpri : पालिकेने नव्याने सुरू केलेल्या भाजी मंडई ठरताहेत आदर्शवत

एमपीसी न्यूज –  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी पाहता संसर्गाचा धोका अधिक जाणवत होता त्यामुळे पालिकेने बाजार मंडई बंद करत खुल्या मैदानात भाजी खरेदी ला परवानगी दिली. पालिकेने नव्याने सुरू केलेल्या या भाजी मंडई आदर्शवत ठरत आहेत. याठिकाणी खरेदीसाठी आलेले ग्राहक सोशल डिस्टन्सिंगचा योग्य अवलंब करत आहेत व कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
खरेदीसाठी आलेले नागरिक मंडई मध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाहेर सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत एका रांगेत उभे राहतात. एक एक करत सॅनिटायझर टनेल मधून पुढे जातात, पुढे गेल्यानंतर टेंपरेचर गनच्या मदतीने त्यांचे बॉडी टेंपरेचर चेक केले जाते आणि पुढे त्या व्यक्तीची नाव नोंदणी केली जाते व त्यानंतरच त्याला भाजी खरेदीसाठी मंडईत सोडले जाते.

मंडईमध्ये सुरक्षित अंतरावर अगदी मोजकेच भाजीविक्रेते बसलेले असतात याठिकाणी कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाते. भाजी मंडई मधील निर्धारित केलेल्या विक्रेत्यांना एक दिवस आड या मंडईत स्टॉल लावण्याची परवानगी दिली जाते, त्यामुळे मंडईमध्ये भाजी विक्रेते व ग्राहक यांची अनावश्यक गर्दी होत नाही.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार मंडई येथील गर्दी हा गंभीर प्रश्न बनला होता, यावर उपाय म्हणून पालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी मोकळ्या मैदानात भाजी मंडई उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी खबरदारी म्हणून पालिकेकडून सुरक्षेच्या सगळ्या उपायोजना केल्यामुळे या भाजी मंडई आदर्शवत ठरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.