Pimpri: महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले तर आनंदच -लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले. तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रीया भाजपचे शहराध्यक्ष नवनिर्वाचित आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. तसेच मंत्री नाही केले तरी दु:ख होणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्यात भाजप-शिवसेना सरकार येण्या इतपत संख्याबळ आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार विराजमान होणार आहे. मागील सरकारमध्ये पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपद मिळणार अशी पाच वर्षे चर्चा होती. परंतु, मंत्रीपद मिळाले नाही. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून महेश लांडगे भाजपकडून निवडून आले आहेत. त्यामुळे नव्या सरकारमध्ये तरी शहराला मंत्रीपद मिळणार का याची चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत बोलताना भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले, भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले. तर आनंदच आहे. तसेच मंत्री नाही केले तरी दु:ख होणार नाही. आम्ही राजकारणाबरोबरच समाजकारणपण करतो. त्यामुळे काम करण्यासाठी मंत्री होणे गरजेचे नाही. आमदार म्हणूनही चांगले काम करता येते. मंत्री म्हणून राज्यभर काम करण्यापेक्षा आमदार म्हणून शहरात काम करता येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.