Pimpri: कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी अवास्तव बिल आकारल्यास ‘या’ ठिकाणी करा तक्रार

If private hospitals charge unreasonable bills on Corona patients, report it to this place

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी ज्यादा वैद्यकीय बिल आकारले असल्यास संबंधित रुग्णांनी [email protected][email protected] या ईमेल वर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमधील खासगी रुग्णालयामध्ये कोविड-19 या आजाराने बाधीत झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय खर्चाची बिले अवास्तव रकमांची येत आहेत. अशा स्वरुपाच्या लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने बिलांची तपासणी करण्यासाठी एक समिती नेमली आहे.

आयकर विभागाचे एन.अशोक बाबू यांची पिंपरी-चिंचवड शहरातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या खासगी रुग्णालयामधील रुग्णांना शासकीय दरपत्रकाप्रमाणे व वाजवी दराने आकारणी केली जाते किंवा कसे ? याची पडताळणी करण्याकामी नियुक्ती केली आहे. या समितीने पाच रुग्णांलयांना नोटीसा दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना नाहक रुग्णालयात दाखल करून घेतल्याचा ठपका ठेवत आणि कोरोनाच्या रुग्णांना बील आकारणी करताना अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या.

त्यानुसार तपासणीअंती चिंचवड येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल प्रमुखांना 6 ऑगस्ट रोजी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

तसेच कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याप्रकरणी नेहरूनगर येथील आयुष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला देखील कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.