BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पिंपरी गावातील हौदात 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन; नदी प्रदूषण रोखण्यास गणेश भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी गावातील वैभवनगर येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या तीन हौदात आज (गुरुवारी) दुपारपर्यंत 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सोमवारी (2 सप्टेंबर) गणेश चतुर्थीला गणेश भक्तांनी मनोभावे गणपतीची स्थापना केली. मंगळवारी (3 सप्टेंबर) दुपारपासून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सुरु झाले. मंगळवार ते गुरुवारपर्यंत या दहा दिवसांत घरगुती व सार्वजनिक मंडळाचे मिळून 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले.

सण, उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये. या उद्देशाने पिंपरीगावात हौद उभारण्यात आले होते. संयोजकांच्या आवाहनाला यावर्षी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने सलग दुस-या वर्षी खासगी जागेत विसर्जनासाठी हौदाची सोय करण्यात आली होती.

HB_POST_END_FTR-A2

.