Pimpri : पिंपरी चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा -अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचा-यांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार बनसोडे यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

आमदार बनसोडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मनपा अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणेबाबत मान्यता देत असल्याचा आदेश डिसेंबर 2019 रोजी दिला होता.

राज्य शासनाने मनपा अधिकारी व कर्मचारीवर्गास सातवा वेतन आयोग लागू करण्यास काही अटींवर मान्यता दिलेली होती. शासनाने ज्या अटींवर पिंपरी चिंचवड मनपास सातवा वेतन आयोग लागू करण्यास परावानगी दिली त्याच अटीवर नवी मुंबई मनपास ही सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिलेली आहे.

नवी मुंबई मनपाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गास सातवा वेतन आयोग लागू झाला नाही, असे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

तसेच पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.