Pimpri : उद्योगनगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. उद्योगनगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध सामाजिक, राजकीय संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  
व्हीएचबीपी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी.के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक जगन्नाथ काटे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थी व शिक्षकांनी आदरांजली वाहिली .त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल आपले विचार मांडले.  काही विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांवर आधारित गाणी सादर केली. तसेच शाळेच्या शिक्षिका कार्तिकला गायकवाड यांनी देखील आंबेडकरांच्या जीवनावर सुंदर गाणे सादर केले. यावेळी मुख्याध्यपिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. प्रज्ञा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर भक्ती लवेकर यांनी आभार मानले.
  • काळेवाडी येथे शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबिटी इंग्लिश मिडियम स्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजाराम शेळके, माजी नगरसेविका अनिता तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, युवा नेते सोमनाथ तापकीर, संस्थेचे संचालक राजू पवार. कय्युम ,शेख, देवराम थोरात. अर्जुन दाखले. दत्ता पवार, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे आदी उपस्थित होते.
काळेवाडी येथील तापकीर चौक येथे शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ व कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर तापकीरनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणागीते सादर करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर, विमलसन्स उद्योग समूहाचे उमेश शिंदे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, हरेश नखाते, ओझोन टेक सोलुशनचे प्रवीण थिटे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, प्रसाद गुप्ते, संतोष जाधव आदी कार्यकर्ते व साई मल्हार सोशल फाऊंनडेशनचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका श्रीमती उल्का जगदाळे, प्रशांत भोसले, नवनाथ तापकीर,रवींद्र बामगुडे यांनी केले. उपस्थित मान्यवराचे स्वागत संस्था संचालक शशिकांत तापकीर यांनी केले. आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार यांनी मानले. सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांचा मुलगा मंथन विशाल जाधव यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान केले.

  • औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन, त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता,  इंटरनॅशनल सेंटरचे डायरेक्टर,  डिफेन्स विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचारासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. पूर्ण भारत देश सशक्त होण्यासाठी सर्व युवकांनी भारतीय समाज सुधारकांच्या साहित्याचे सखोल वाचन करणे गरजेचे आहे. आपला भारत देश तरुणांच्या जीवावरच महासत्ता होणार आहे. त्यामुळे सर्व तरुणांनी समाजसुधारकांचे विचार आत्मसात करायला पाहिजेत असा  संदेश डॉ. विजय खरे यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाविद्यालयात ‘एक मत-एक मूल्य’ याविषयीची  शपथ घेण्यात आली. तसेच महाविद्यालयातील वाचनकक्षात  ग्रंथालयातील महापुरुषांची चरित्रे ठेवली असून,  सलग पंधरा तास  वाचन करण्यासाठी वाचनकक्ष खुला करून देण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, डॉ. संजय नगरकर, प्रा.भीमराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. सुहास निंबाळकर यांनी तर आभार डॉ. सुप्रिया पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.क्यू.ए.सी. कमिटीच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले.
  • रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाअध्यक्ष विनोद चांदमारे, अॅड. दीपक ओव्हाळ, सतीश कसबे, विलास गरड, शेषराव सूर्यवंशी, नारायण वानखेडे, पंढरी खिलारे, बाबासाहेब कांबळे, बाळासाहेब कोळपे, अंकुश सरवदे, बलभीम सोनकांबळे, आत्माराम सोनकांबळे, आत्माराम हनवते, सोपान खंदारे आदी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने साजरी करण्यात आली. आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पूर्णाकृती  प्रतिमेस  डॉ अशोक  शिलवंत यांच्या  हस्ते पुष्पहार  अर्पण  अभिवादन  करण्यात आले. यावेळी डॉ . मिलिंदराजे भोसले, सत्यसेन शिरसाठे, संदीप मकासरे, मारूती पंढरी, शिवशाही व्यापारी संघाचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष  बाळासाहेब गायकवाड, दीपक कांबळे, गोरख पाटील, मारूती मस्के, रविकिरण घटकार आदी उपस्थित होते. शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या हस्ते  बोधीवृक्षास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, विशाल बाविस्कर, सौरभ शेंडगे, अक्षय घटकार, माऊली जाधव, आशिष वाळके, अमोल तेलंगे, अर्जुन दाखले आदी  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.