Pimpri : एक दिवसात शहरातील 125 अल्पवयीन चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 125 अल्पवयीन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश दिले होते.

अल्पवयीन वाहन चालकांमुळे अपघात होतात. बहूतांशवेळा अल्पवयीन चालक जखमी होऊन कधी-कधी जीवित हानीही होते. शाळा महाविद्यालयात वाहने घेऊन येण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा रोडरोमिओ देखील दुचाकीवरून स्टंटबाजी करतात. या प्रकाराला आळा बसावा म्हणून अल्पवयीन वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्‍त नीलिमा जाधव यांना गुरुवारी दिले.

शुक्रवारी शहरातील महाविद्यालयाच्या बाहेर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरवात केली. दिवसभरात 125 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. अल्पवयीन वाहन चालकाच्या पालकांना बोलावून त्यांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच अल्पवयीन चालक आणि त्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सहायक आयुक्‍त नीलिमा जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.