Pimpri : शहरात ईद उत्साहात, कोरोनामुळे यंदा प्रथमच मशिदींऐवजी घरात नमाज पठण

In the excitement of Eid in the city, for the first time this year, prayers were offered at home instead of in mosques due to corona

एमपीसी न्यूज – सामाजिक शांतता आणि सर्वधर्मीयांच्या सुखासाठी प्रार्थना करत शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद- उल- फित्रची (रमजान ईदची) नमाज आज घरातूनच अदा केली.

दरवर्षी भव्य उत्सवाचे स्वरूप असलेली रमजान ईद यावर्षी शांततेत साजरी करण्यात आली. पिंपरी -चिंचवड शहरातील 160 हून अधिक मशीद व मदरशांमध्ये वेगवेगळ्या वेळेत तेथील मौलानांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना अलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात.

मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येक मुस्लिम बांधवांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करत आपापल्या घरात नमाज पठण केले.

रमजानच्या काळात सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत उपवास करुन मुस्लिम बांधव रोजा पाळत असतात. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.

आज ईदच्या दिवशी पहाटे मुस्लीम बांधवांनी घरातच लवकर उठून ‘फजर’ची नमाज पठण केली.

ईदच्या दिवशी पहाटे पासूनच गृहिणींचा दिवस सुरू होतो. ईदच्या दिवशी घरी येणार्‍या पाहुण्यांना ‘शीरखुर्मा’ यासाठी या गृहिणी खूप मेहनतीने त्याची तयारी केली होती.

यंदा मात्र, सर्व धर्मिंयानी एकत्रित शीरखुर्म्यांचा आस्वाद घेता आला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा रविवारी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या व कोरोनाच्या या संकटातून मुक्त करण्याची ‘अल्ला’कडे दुवा मागण्याची विनंती केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.