Pimpri: स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात जागतिक योगदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – जागतिक योग दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळामध्ये शुक्रवारी (दि. 21) पहाटे योगविषयक जनजागृतीसाठी विशेष योगवर्गाचे आयोजन करण्यात आले. पतंजली योगपिठाच्या योगशक्षिका शारदा रिकामे यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

दैनंदिन जीवनात आहार, विहार, व्यायाम याबरोबरच योग-प्राणायामाचे महत्व समजावून सांगितले. आजारी पडल्यानंतर उपचार करण्याऐवजी आजारी पडूच नये यासाठी योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम नियमितपणे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विविध आजार व त्यावर उपयुक्त आसने याविषयी त्यांनी माहिती दिली.

  • संदिपा मोरे यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिके करून दाखवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. गिरीश आफळे, विनोद बन्सल, श्रीकांत मापारी, दादा देसाई, अश्विनी अनंतपुरे आदींनी यावेळी प्रात्यक्षिके केली. भास्कर रिकामे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. दिपक नलावडे यांनी नियोजन केले.

चिंचवड बधिर मुक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व अध्यापकांनी जागतिक योगदिनानिमित्त योग प्रात्यक्षिके केली. योगशिक्षीका शारदा रिकामे यांनी सर्वांकडून योग प्राणायाम करुन घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.