Pimpri : पोलिसात तक्रार दिल्यावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 14) रात्री दुर्गामाता मंदिराजवळ गांधीनगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे नोंदवले आहेत.

राजू शंकर म्हेत्रे (वय 29, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नरेश राजप्पा म्हेत्रे (वय 29), दीपक राजप्पा म्हेत्रे (वय 36), नरेशच्या बहिणीचा मुलगा विष्णू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास राजू दुर्गामाता मंदिराजवळून पायी चालत कामाला जात होते. त्यावेळी राजू आणि आरोपी यांच्यामध्ये एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून भांडण झाले. आरोपींनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली. यामध्ये राजू यांच्या मोठी बहीण अम्मा या जखमी झाल्या आहेत. तसेच आरोपींनी राजू यांच्या घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात दीपक राजप्पा म्हेत्रे (वय 38, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजू शंकर म्हेत्रे (वय 29), नरेश सोमाप्पा म्हेत्रे (वय 44), सिद्धाराम सोमाप्पा म्हेत्रे (वय 40), शंकर सिद्धाराम म्हेत्रे (वय 18, सर्व रा. गांधीनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी राजू याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून त्याने गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सिमेंटच्या गट्टूने दीपक यांच्या पाठीत आणि डोक्यात मारून जखमी केले. आरोपी नरेश याने विटेच्या तुकड्याने पाठीवर आणि पोटावर मारून जखमी केले. तर आरोपी शंकर याने सिमेंटच्या तुकड्याने दीपक यांना नाकावर मारले. तसेच आरोपींनी दीपक यांचे वडील, भाऊ आणि भावजय यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.