Pimpri: ‘वायसीएमएच’मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे जूनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

आचारसंहितेनंतर भरती प्रक्रिया राबविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सुरु करण्यात येत असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 3 जूनला उद्‌घाटन करण्याचे नियोजन आखले आहे. हा भ्यासक्रम सुरु करण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी अधिका-यांना दिल्या.

महापालिकेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आढावा आज (गुरुवारी) वायसीएमएचमध्ये पार पडली. या बैठकीला पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. पद्माकर पंडीत, सहाय्यक आयुक्‍त मनोज लोणकर, मंगेश चितळे तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली. त्यामुळे वायसीएममध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 24 जागा भरण्यात येणार आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय संस्था करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भारतातील पहिली महापालिका आहे. वायसीएममध्ये औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची कमतरता असते.

वायसीएमएच रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही कार्यान्वित आहे. या महाविद्यालयासाठी विविध 103 पदे मंजूर झाली आहेत. नवीन अभ्यासक्रमासाठी नऊ प्राध्यापक, 15 सहयोगी प्राध्यापक तसेच 21 सहायक प्राध्यापक अशी 45 पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आचारसंहितेनंतर जाहिरता प्रसद्धि केली जाणार आहे.

  • दरम्यान, या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विविध कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना 16 मार्च रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. विद्युतीकरणाचे काम 7 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना न पाळल्याने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना तुमची वेतनवाढ का रोखू नये? याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांनी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्‍त मनोज लोणकर यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.