Pimpri News : महिला पोलीस अंमलदार कक्षाचे पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते उद्घाटन 

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत (Pimpri News ) महाळुंगे एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे आवारामध्ये महिला पोलीस अंमलदारा करीता नेक्सटीयर ऑटोमोटीव्ह इंडीया प्रा लि कंपनी महाळुगे यांचे सहकार्यातून रोटरी क्लब एन. आय. बी. एम. पुणे यांचे प्रयत्नातुन सुसज्य अशी महिला अंमलदार कक्षाची उभारणी करण्यात आली होती. या कक्षाची गुरुवारी(दि.23)पोलीस आयुक्त  विनय कुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

 

 

Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांची आख्यायिका विशद करणारे गीत प्रदर्शित

 

 

या वेळी कार्यक्रमावेळी  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- 1  विवेक पाटील, महाळुगे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर साबळे, चाकण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक  वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, विलास गोसावी, दत्तात्रय जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक संगिता भंडरवाड व सर्व पोलीस अंमलदार, सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्या असे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे वेळी बोलताना पोलीस आयुक्त चौबे यांनी सांगितले की, महाळुगे एम.आय.डी.सी. परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे महाळुगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनची नुकतीच निर्मीती करण्यात आलेली आहे. सदरचे पोलीस ठाणे नविन असल्याने त्यासाठी उपयुक्त अशी साधनसामुग्री व सुखसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावरुन योग्यती कार्यवही सुरु आहे.

पोलीस ठाण्यातील महिला अंमलदार यांचे कर्तव्याचे कालावधीची अनिश्चिततामुळे महिला अंमलदार यांना पोलीस ठाण्यातच विश्रांती घेण्यासाठी, गणवेष बदली करणे या करता स्वतंत्र महिला कक्षाची आवश्यक्ता होती ती नेक्सटीयर ऑटोमोटीव्ह इंडीया प्रा. लि. कंपनी महाळुंगे यांचे सहकार्यातुन पुर्ण करण्यात आली. अशीच मदत एम. आय. डी. सी. मधील इतर मोठया कंपन्यांनी केलीतर नक्कीच महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे सुविधांचे बाबत आग्रभागी गेल्याशिवाय राहणार नाही भविष्यात कंपन्यांच्या मदतीमुळे पोलीस प्रशासनाचे कामकाजामध्ये उत्सह वादुन पर्यायाने जनतेला व कंपन्यांना वेळेत तत्पर सेवा भेटण्यास मदत होईल. तसेच पोलीस बांधवांना ज्या सेवा उपलब्ध आहेत व भविष्यात ज्या सेवा उपलब्ध होणार आहेत यातुन जनतेच्या व औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या अडी अडचणी सोडविण्यास तत्परता दाखवावी, असे पोलीस आयुक्त  विनयकुमार चौबे यांनी सांगितले,

या कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करुन पोलीस पाटील यांना त्यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले तसेच पोलीस पाटील हे जनता व पोलीस यांचे मधील महत्वाचा दुवा असल्याने पोलीस पाटील यांना त्यांचे कर्तव्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्या सोडविण्याची ग्वाही पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी बोलताना दिली. महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरातील औद्योगिकीकरणाची व पोलीस ठाण्याची व्याप्ती बघता नविन ठिकाणी पोलीस ठाण्याची सुसज्य इमारत आवश्यक असल्याचे सांगुन पोलीस ठाण्याचे (Pimpri News ) इमारती करीता एम.आय.डी.सी.कडुन प्राप्त जागेची पाहणी करत त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना ही आयुक्तांनी दिल्या.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.