Pimpri: शहरातील ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये वाढ, आपला परिसर प्रतिबंधित क्षेत्र ?

शहरातील 'ही' 37 ठिकाणे कंटेन्मेट झोन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहराच्या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आजमितीला शहराच्या 37 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 37 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित केली आहेत. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे.

कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 ते 27 एप्रिल दरम्यान संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहर ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधिक क्षेत्र) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याचे सांगत सक्रिय रुग्ण असलेली 21 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन जाहीर केली होती.

त्यानंतर ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन घोषित केला जात आहे.शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून शहराच्या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये वाढ होत आहे. ज्या भागात रुग्ण सापडतील तो भाग ‘कंटेन्मेंट’ झोन म्हणून घोषित केला जात आहे.

शहरातील ‘ही’ 37 ठिकाणे आहेत ‘कंटेन्मेंट झोन’ !

पिंपरी वाघेरे येथील तपोवन रोड, फुगेवाडी, खराळवाडी, आकुर्डीतील शुभश्री सीएचएस, पिंपळेगुरव येथील जगताप कॉम्पलॅक्स, शिवनेरी कॉलनी, विनायकनगर, पिंपळेनिलख येथील शिवाजी चौक, पिंपळेसौदागरमधील शुभश्री गृहनिर्माण सोसायटी,  जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी, पवनानगर, थेरगावातील 16 नंबर बसस्टॉप, दत्तनगर,

काळेवाडी, रहाटणीतील छत्रपती चौक, तांबे शाळा, तापकीर चौक, कस्पटे वस्ती, चिंचवडमधील इंदरानगर, आनंदनगर, मोहननगर,  किवळेतील विकासनगर,भोसरीतील गुरुविहार सोसायटी, हुतात्मा चौक,  लांडगेनगर, चक्रपाणी वसाहत, मोशीतील गंधर्वनगरी, बनकर वस्ती, वुड्स विले, दिघीतील विजयनगर, तनिष्क आयकॉन, च-होलीतील निकम वस्ती, साठेनगर, रुपीनगर, तळवेडीतील न्यु अँजल स्कूल, ताम्हाणे वस्ती, संभाजीनगर येथील बजाज स्कूल परिसर हा भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये आहे.

या परिसरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.