Pimpri: श्वास घेण्यास त्रास होणा-या कोरोना रुग्णात वाढ, मृत्यूचे प्रमाणही वाढले

Pimpri: Increase in corona patients with difficulty breathing, Mortality also increased कोरोनात 'व्हायरल' लोडचा एक भाग असतो. विशिष्ट प्रकारचा डोस मिळाला. तर, त्यातून संसर्ग होतो.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढणा-या रुग्णसंख्येत श्वास घेण्याचा त्रास होणा-या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यात श्वास घेण्याचा त्रास होत असलेल्यांची मृत्यू संख्या जास्त आहे. 12, 21, 30, 40 अशा वयोगटातील रुग्णांचाही मृत्यू होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला केवळ वयोवृद्धांचा मृत्यू होत होता.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी आढळला होता. तेव्हापासून आजपर्यंत शहरातील 11364 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 0.35 टक्के आहे.

तर 7070 रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. त्याचे प्रमाण 62.21 टक्के आहे. तर, सध्या 4084 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असून त्याचे प्रमाण 35.93 टक्के आहे. आजपर्यंत शहरातील 212 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.86 टक्के आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला पाचशेहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामध्ये श्वासनाचा त्रास होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.

मागील काही दिवसांपासून दिवसाला 15 ते 17 जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये 12, 21, 30 ते 40 या वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. लहान मुले, तरुण, युवकांचाही कोरोनामुळे मृत्यू होऊ लागल्याने भीती, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्वासनाचा त्रास होणा-या रुग्णांच्या मृत्यूत वाढ

‘एमपीसी न्यूज’शी बोलताना ‘वायसीएम’ रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून त्यात श्वासनाचा त्रास होणा-या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.

कोरोनात ‘व्हायरल’ लोडचा एक भाग असतो. विशिष्ट प्रकारचा डोस मिळाला. तर, त्यातून संसर्ग होतो. हा डोस जास्त प्रमाणात असेल, एखादा व्यक्ती बाधित वातावरणात जास्त वेळ राहिल्यास त्याला ‘व्हायरल’ लोड जास्त असतो.

अशा व्यक्तीचे शरीर त्याच जोमाने व्हायरलला प्रतिकार करते. प्रतिकारशक्ती आणि ‘व्हायरल’ या दोघांच्या युद्धात माणसाचा मृत्यू होतो. यामध्ये तरुण, युवकांचाही मृत्यू होत आहे.

 

बेड वाढविण्यावर भर 

”श्वसनाचा त्रास होणा-या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडची आवश्यकता असते. त्यासाठी जवळपास 50 आयसीयूचे वाढीव बेड तयार केले आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले.

त्यात वायसीएममध्ये 30 बेड, जिजामाता रुग्णालयात 12 आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात 10 बेड तयार केले आहेत. आयसीयूमध्ये डेडिकेटेड मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यासाठी बाहेरुन 50 डॉक्टर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सुविधा वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.