Pimpri : डेंग्यूच्या डंखात वाढ! फवारणी, धुरीकरण कधी करणार?

एमपीसी न्यूज – वैद्यकीय विभागाने तपासणी केलेल्या (Pimpri) रुग्णांच्या यावर्षीच्या अहवालात 11 जुलैपर्यंत डेंग्यूचे 3 रुग्ण आढळले होते. या अहवालानुसार जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत सुमारे 1 हजार 14 संशयितांना डेंग्यूसारखी लक्षणे आढळून आली आहेत. डेंग्यूचा कहर वाढत असताना महापालिकेकडून उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येते. शहरात कोठेही फवारणी, धुरीकरण पालिकेकडून अद्यापर्यंत करण्यात आले नाही.

शहरात गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साठून राहून डासांची संख्या वाढल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग, वैद्यकीय विभागाने पाऊले उचलावीत. आवश्‍यक त्या ठिकाणी फवारणी यावी अशी मागणी होत आहे.

डेंग्यू, मलेरिया संशयित रुग्णांत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत तापाच्या रुग्णांची गर्दी होत आहे.

आरोग्य विभागाने या वर्षी जून आणि जुलै महिन्यात कायमस्वरूपी व तात्पुरती प्रजनन स्थळे नष्ट केली असून शहराच्या हद्दीतील 287 निवासी व व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. या दोन महिन्यांत डास उत्पत्तीची ठिकाणे साफ करण्यात अपयशी ठरल्याबद्दल आजअखेर महापालिकेने 8 आस्थापनांना 57 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पण, महापालिकेकडून शहरात कुठेही फवारणी, धुरीकरण केले नाही. त्यामुळे महापालिकेने शहरात सगळीकडे धुरीकरण करण्याची मागणी नागरिकांककडून केली जात आहे.

Entertainment News : रोहित शेट्टी घेऊन येत आहे ‘खतरों के खिलाडी सिझन 13’

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना  (Pimpri ) राबविणे आवश्यक असून डासांची उत्पत्ती होणारी स्थळे प्राधान्याने नष्ट करणे महत्वाचे आहे. यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली असून विशेष पथकांचीदेखील प्रभागनिहाय नेमणूक करण्यात आली आहे.

या पथकामार्फत नियमितपणे तपासणी आणि कारवाई करण्यात येत आहे. पथकांमध्ये आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे. कीटकजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी बांधकामाधीन ठिकाणांसह निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांनी सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी. धुरीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, शहराच्या सर्व भागात धुरीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.