Pimpri: शहरातील ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये वाढ; ‘हे’ आहेत 107 प्रतिबंधित क्षेत्र, पाहा आपण कुठे राहता?

Pimpri: Increase in the city's 'containment' zone; 'These' are 107 restricted areas, see where you live? रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याने सक्रिय रुग्ण असलेली 21 ठिकाणेच 'कंटेन्मेंट' झोन जाहीर केली होती. त्यानंतर ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग 'कंटेन्मेंट' झोन घोषित केला जात आहे.

एमपीसी न्यूज- लॉकडाउन शिथिल करत जनजीवन पूर्वपदावर आणल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने ‘कंटेन्मेंट झोन’मध्येही वाढ होत आहे. शहरातील ‘कंटेन्मेंट’ झोन 21 वरुन 107 वर पोहोचले आहेत. आजमितीला शहराच्या 107 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 107 ठिकाणे ‘कंटेन्मेंट झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित केली आहेत. या क्षेत्रातील निर्बंध कडक असणार आहेत. परिसरातील नागरिकांवर विविध बंधने लादली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. राज्यातील पहिला रुग्ण होता. त्यानंतर रुग्ण संख्येत वाढ होत होती. त्यामुळे राज्याचे लक्ष शहराकडे लागले होते.

रुग्ण वाढ होत असल्याने कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी एप्रिलमध्ये आठ दिवस संपूर्ण शहर ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधिक क्षेत्र) म्हणून घोषित केले होते.

त्यानंतर रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याने सक्रिय रुग्ण असलेली 21 ठिकाणेच ‘कंटेन्मेंट’ झोन जाहीर केली होती. त्यानंतर ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग ‘कंटेन्मेंट’ झोन घोषित केला जात आहे.

शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहराच्या संपूर्ण भागात कोरोनाचे रुग्ण आहेत. दररोज नव-नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये वाढ होत आहे.

ज्या भागात रुग्ण सापडतील तो भाग ‘कंटेन्मेंट’ झोन म्हणून घोषित केला जात आहे. ‘कंटेन्मेंट’ झोनमधील नागरिकांवर मोठी बंधने असतात. शहर नॉन रेडझोन आहे. त्यामुळे शहरातील दुकाने, कंपन्या सुरु केल्या आहेत. अनेक सुविधा दिल्या आहेत. पण, ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये निर्बंध कडक असणार आहेत.

शहरातील ‘ही’ 107 ठिकाणे आहेत ‘कंटेन्मेंट’ झोन!

पिंपरीतील वल्लभनगर, आकाशनगर सोसायटी, शास्त्रीनगर, वैभवनगर रोड दोन, खराळवाडीतील साईसिद्धी अपार्टमेंट, भीमनगर, बौद्धनगर, गुरुदत्तनगर, नाणेकर चाळ, भाटनगर, सोनकर कॉम्पलॅक्स, सोनकर चेंबर्स, नेहरुनगरमधील नवजीवन सीएचएस, मोरवाडीतील सुखवानी इंमपेरियल, लालटोपीनगर, आकुर्डीतील दत्तनगर, रामनगर, आदर्श गृहनिर्माण सोसायटी, काळभोरनगर, प्राधिकरणातील आनंद पार्क, सेक्टर 27, दापोडीतील गुलाबनगर, न्यू गुलाबनगर, एसएमएस कॉलनी, शेवळे अपार्टमेंट, माने चाळ, कासारवाडीतील केशवनगर,

चिंचवडमधील बहिरवाडे कॉप्लॅक्स, शाहूनगर, सोनिगरा ओपेल, आपुलकी सीएचएस, रेणुका अपार्टमेंट दळवीनगर, बिजलीनगरमधील श्रीराम कॉलनी, केशवनगर, साईबाबानगर, किवळेतील एमबी कॅम्प, सिद्धीविनायक कॉलनी, रावेतमधील हॉलमार्क अव्हेन्यू, वाल्हेकरवाडीतील गुरुदत्त कॉलनी.

पिंपळेसौदागर येथील रोझ आयकॉन, कवडेनगर, गणेशम दोन, रॉयल एम्पेरिओ, दिव्या हाईट्स, पिंपळेगुरव मधील नेताजीनगर, रामकृष्ण चौक, सांगवीतील शिवांजली रोड, मधुबल लेन दोन, समतानगर, ममतानगर लेन दोन, जुनी सांगवीतील शिंदेनगर, संगमानगर, साई स्नेहा पार्क, येस रेसिडन्सी संगमानगर, ढोरेनगर, उषकाल सीएचएस, पिंपळेनिलखमधील शिक्षक सोसायटी.

चिंचवडमधील इंदिरानगर, आनंदनगर, वाकडमधील सद्गुरु कॉलनी, माउली चौक कलाटेनगर, कमलाकर चौक, मानकर एम्पायर, बेला वेस्टा, ज्ञानप्रभा स्कूल, काळेवाडीतील विजयनगर, नढेनगर, सखीहरी बँक, ज्योतीबा नगर, रहाटणीतील शिवतिर्थनगर, थेरगावातील बेलटिकानगर,

भोसरीतील राधाकृष्णनगर, साई अपार्टमेंट गुरुविहार, खंडोबा माळ, दोन, बालाजीनगर, गीता सोसायटी, गवळीनगर, संत तुकारामनगर, चिखलीतील यशवंतनगर, पाटीलनगर, मोरेवस्ती, रेजेंट पार्क, गोकूळ सीएचएस, ओम साई सीएचएस, ईमनझेका पार्क, क्रिस्टल सिटी.

निगडीतील महात्माफुले सोसायटी, साईकृपा सीएचएस, साईनाथनगर, निगडी रुपीनगरमधील कौतय सीएचएस, पंचदूर्गा सीएचएस, त्रिवेणीनगर, अजंठानगरमधील सिद्धार्थ बिल्डींग, यशोदा सीएचएस, थरमॅक्स चौक, चऱ्होलीतील तनिष्क ऑर्केड, काटेनगर, फुलेनगर, वडमुखवाडी, दिघीतील बीयू भंडारी, बोपखेलमधील छत्रपती चौक हा भाग ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये आहे.

या परिसरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या परिसरातील नागरिकांवर विविध बंधने आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.